बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या लोहारा येथील प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शिला मंडप व कळस निर्माण निमित्त संकल्प (मंगल) आणि शुभारंभ विधिवत पुजा कार्यक्रम बुधवारी दि.९) पार पडला.
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर मंदिरा पर्यंत ष .ब्र. १०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज आणि म.नि.प्र. गंगाधर महास्वामीजी (जेवळी) यांच्या मिरवणुकीने काढण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकित बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार बांधकाम, निधी याबाबत सविस्तर चर्चा करून भव्य दिव्य असे मंदिर निर्माणबाबत चर्चा करण्यात आली. आध्यात्मिक व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी काळाच्या ओघात मंदिराच्या बांधकामावर जीर्णता आल्याने लोहारा येथील ग्रामस्थांनी मंदिराचा पुनर्विकास व नुतनीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी शंकर जट्टे, दत्ता बिराजदार, बसवराज तोडकरी, पंचय्या स्वामी, मधुकर बिराजदार, दत्ता फावडे, विजय माशाळकर, दिपक मुळे, के.डी. पाटील, जालिंदर कोकणे, हरी लोखंडे, प्रा. राजेंद्र चिकटे, ओम पाटील, श्रीशैल्य स्वामी, अमोल बिराजदार, राजु जट्टे, मल्लिनाथ फावडे, शेखर माणिकशेट्टी, राजु स्वामी, संजय माशाळकर, चिदानंद स्वामी, विवेकानंद स्वामी, श्रीशैल्य मिटकरी, गणेश कमलापुरे, सुनील स्वामी, सचिन तोडकरी
यांच्यासह महिला, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







