लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने युवकांमध्ये आरोग्य, फिटनेस, व्यायामाची आवड तसेच सामाजिक एकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने ३ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवारी (दि. २२) हिप्परगा (रवा) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत गावातील तसेच परिसरातील युवक, नागरिक आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. तरुण पिढीने मोबाईल आणि इतर दैनंदिन व्यस्ततेपासून काही काळ दूर राहून शारीरिक तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे, व्यायामाची सवय लागावी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहून मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. जगदंब प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.








