लोहारा तहसिल कार्यालयात मंगळवारी (दि.५) लोहारा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.
लोहारा तहसील कार्यालयात मंगळवारी (दि.५) क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा क्रीडा कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तालुका क्रीडा संयोजन समिती लोहरा यांच्या आयोजनानुसार शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या १० क्रीडा प्रकारांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार रतन काजळे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी प्रयत्न करावे आणि स्पर्धांचे आयोजन नियोजन योग्य करावे. कुठल्याही प्रकारची तक्रार न करता स्पर्धा पार पाडाव्यात अशी अपेक्षा क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी यावेळी व्यक्त केली. नायब तहसीलदार रतन काजळे यांनी स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व शाळांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका संयोजन समितीचे सचिव मुकेश सोमवंशी, अध्यक्ष गोपाळ सुतार, व्यंकट क्षीरसागर, बी.एस. पाटील, किशोर साठे, सिद्धेश्वर विभुते, रोहन जगताप, गावडे सर, कदम सर, चिकुंद्रे सर, जाधव सर, राठोड सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ सुतार यांनी केले.
