जिल्ह्याच्या राजकारणातील विकासाभिमुख, शांत, संयमी, कृतिशील व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्याकडे पाहिलं जातं. अजातशत्रू व्यक्तिमत्व असणारे सुरेश दाजी जिल्ह्याच्या राजकारणात मागील ४१ वर्षापासून सतत जनसामान्यांच्या विकासासाठी अहोरात्र काम करताना दिसतात. आमदार, खासदार नसतानाही स्वकर्तृत्वावर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्हे तर खऱ्या अर्थाने सहकारातील जाणकार, अभ्यासू, प्रचंड अनुभव असलेले तज्ञ व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी सहकार चळवळ उभी केली आणि गतिमानही केली.

बलसुर विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदापासून सुरू झालेला प्रवास सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना उभारण्यापासून जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या, अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेसह तेरणा, तुळजाभवानी सहकारी साखर कारखाने चालू करण्यासाठी केलेला संघर्ष सबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे. शासनाची आणि निसर्गाची साथ नसतानाही आयुष्याचे वीस ते पंचवीस वर्ष भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी घरच्या जमीनी, आई, पत्नीचे सोने दाग दागिने वर्षानुवर्ष गहाण टाकून सभासदांच्या मालकीचे असलेले सहकारी युनिट उभारणारे हे एक वेगळच रसायन म्हणावं लागेल. आज त्यांच्या या संघर्षाला यश आलं असून उमरगा लोहारा तालुक्यासह तुळजापूर, निलंगा, औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सर्वाधिक व वेळेत दर देणारा कारखाना म्हणून नावलौकिक मिळवला आहे. सामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी याचा निश्चितच फायदा होत असताना आपण पाहत आहोत.
कै. आमदार भाऊसाहेब बिराजदार यांचा वारसा समर्थपणे चालवत अठ्ठावीस वर्षांपूर्वी उभी केलेली भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आज जिल्ह्यात सात शाखा असून लाखो सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिकांना उभे करण्याचं काम त्यांनी केलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कित्येक मराठा कुटुंबातील युवकांना वीस कोटी रुपयांचा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल आहे. फक्त भाषणात बोलून हे शक्य नसतं तर प्रत्यक्ष कृतीशील कृती करावी लागते आणि त्यानंतरच कित्येकांचे संसार फुलतात, कुटुंबेच्या कुटुंबे उभे राहतात आणि खरा विकास, खरं सहकार कशाला म्हणतात हे दाजींच्या कृतीतून दिसून येतं.
एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेची अर्थवाहिनी असलेल्या उस्मानाबाद जिल्हा बँकेवर संकट आल्यानंतर एक छदामही बँकेत नसताना बँकेचे चेअरमन पदाची धुरा सांभाळत बँकेची गाडी, बँकेचा भत्ता न घेता बँकेला उर्जित अवस्था आणण्यासाठी सहकारातील अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर अहोरात्र कष्ट घेऊन बँकेला स्थिर ठेवले. आज ही बँकेची आस्था असणारे कर्मचारी, सभासद शेतकरी त्यांच्या निस्वार्थपणे केलेल्या कार्याची महती सांगतात. बँकेला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाचे असणारे तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखाना चालू करणे अत्यावश्यक असल्याने हे कारखाने चालू करण्यासाठी शासन, प्रशासन, एम.एस.सी. बँक या साऱ्यांशी संघर्ष करत समन्वय साधत आपल्या सहकारातील डावपेचाची चुणूक दाखवत दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर चालवायला दिले आणि कारखान्यासह बँकेलाही उर्जीत अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या योगदामुळे जिल्ह्यातील अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक, तेरणा आणि तुळजाभवानी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. आपल्या कृतिशील सहकारातील योगदानामुळे लाखो लोकांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत अविरत काम करणाऱ्या जिल्ह्यातील सहकारातील शिरोमणी सहकार महर्षी प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!