Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
01/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
Ad 10

लोहारा शहरात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीचे हे २६ वे वर्ष आहे. यात्रा महोत्सवात पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत हा यात्रा महोत्सव होणार आहे. या यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लोहारा शहरात यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी २६ वे वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या दिवशी शोभायात्रा होणार आहे. या शोभयात्रेचे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच महादेवाची आरती होईल. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव (महिलांसाठी ) होणार आहे. याच दिवशी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.१६)) सकाळी साडे अकरा वाजता भुजंग महाराज पळसकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.

शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास चांदीची महादेवाची पिंड शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्यास लोहारा खुर्द येथील संजय रसाळ यांच्या वतीने रु. ५०००/- व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
तिसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सायंकाळी चार वाजता भारतमाता मंदिराच्या पाठीमागील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. चौथ्या दिवशी बुधवारी (दि.१८) सकाळी १० वाजता श्री बसवेश्वर मंदिर येथे महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा व व्यंगचित्र, छायाचित्र प्रदर्शन होणार आहे. रात्री सात वाजता भव्य जंगी जुगलबंदी हा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. पाचव्या दिवशी गुरुवारी (दि.१९) सायंकाळी सात वाजता हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहारा
Previous Post

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's