लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील आष्टा शिक्षण संस्था संचलित आष्टा हायस्कूल येथे राउंड टेबल ट्रस्ट यांच्या अकादमी विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाच नवीन वर्गखोल्यांच्या लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणात प्रगती साधावी असे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या वर्गखोल्यांमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला नवी चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून नितेश सचदेव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश चौधरी होते. विशेष अतिथी म्हणून गजानन अल्लिशे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राउंड टेबल ट्रस्टचे संचालक छगनराव शितोळे, धनंजय गोडबोले, रुचिरा गोडबोले, नीरज पाटील, अजय सोनी, सप्रेम कोठारी, शर्वरी कोठारी, साहिल कटारे, पवन गोगिया, युईका गोगिया, रवीराम रख्खाणी, यश निचानी, जान्हवी निचानी, आकाश आयनापुरे, स्वाती आयनापुरे, वामिनी तापडिया, शशांक कार्वेकर, राशी कार्वेकर, श्रीकांत जयप्रकाश चौधरी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद शंकरराव धडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संजीवनी संजय शिंदे (बारावी कला प्रथम), कु. विशाखा शरणाप्पा बेळंबे (बारावी कला द्वितीय), कु. मोहिनी म्हाळाप्पा गुंड (बारावी कला तृतीय), कु. ऋतुजा भीमाशंकर फुंडीपल्ले (दहावी प्रथम), कु. संध्या विद्यासागर कार्ले (दहावी द्वितीय) आणि कु. विजयालक्ष्मी गुरुबसप्पा पाटील (दहावी तृतीय) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. के. फुंडीपल्ले यांनी केले. यानंतर सुमित गुप्ता, ऋषभ पटोडिया, धनंजय गोडबोले, सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षणाच्या उन्नतीसाठी राउंड टेबल ट्रस्टच्या योगदानाचे कौतुक केले. नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेला बळकटी देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. कोळी यांनी तर ए. बी. सुरवसे यांनी आभार मानले.








