लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी (दि.१५) प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून लोहारा पंचायत समितीचे उपसभापती अमोल पाटील होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर बोमणे होते. यावेळी उपसरपंच सिध्देश्वर लादे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कालिदास दरेकर, शिक्षण प्रेमी नागरीक युवराज लादे, संतोष वैद्य तसेच पालक उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व गोड खाऊ देवून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पांचाळ यांनी केले. कार्यक्रम सजावट तसेच व्यवस्था सुप्रिया माळवदकर यांनी केले. सुत्रसंचालन बाबासाहेब कदम यांनी तर मेघराज कदम यांनी आभार मानले.








