महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिप्परगा (रवा) येथील नरसिंह प्रतीष्ठानच्या वतीने गुरुवारी (दि.२३) नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील नरसिंह प्रतीष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारी पिठाची गिरणी व जिल्हा परिषद शाळेतील संगणक वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, लोहारा पं. स. सभापती पल्लवी जानकर, उमरगा पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटिल, उपसभापती अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच सुनील जाधव, विजय लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इंद्रजीत लोमटे, नारायण क्षिरसागर, विजय नरगाळे, मनोज गवळी, सारंग गाटे, मधुकर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय लोमटे यांनी केले. सुत्रसंचलन विशाल सुर्यवंशी यांनी तर मनोज गवळी यांनी आभार मानले.








