लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून आषाढी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी (दि.२४) हा दिंडी सोहळा घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदंग, भगवे ध्वज आणि पालखीच्या साथीने “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय जय राम कृष्ण हरी”, “विठ्ठल विठ्ठल” अशा नामघोषात दिंडी काढली. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, सांस्कृतिक वारसा, शिस्त, भक्ती आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आणि संत परंपरेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणात ही दिंडी यशस्वी केली. उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावातील भजनी मंडळ, शा.व्य.समितीचे अध्यक्ष किशोर बोमणे, मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ, सहशिक्षक मेघराज कदम, बाळासाहेब कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया माळवदकर व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.








