लोहारा येथे आ. बसवराज पाटील यांचा शनिवारी (दि.१) नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. उस्मानाबाद – बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानिमित्त यावेळी लोहारा तालुका भाजपासह विविध संस्था, तालुक्यातील नागरिकांनी सत्कार केला.

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागन्ना वकील होते. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, लक्ष्मीकांत पाटील, गुंडाप्पा भुजबळ, शरणाप्पा पत्रिके, अबुलवफा कादरी, दिलीप भालेराव, अरुण माळवदकर, अभिमान खराडे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय वाघमारे, मालन कांबळे, स्वप्नील कारभारी, नागनाथ पाटील, सिद्रामप्पा दुलंगे, नितीन पाटील, उमाकांत जट्टे, नगरसेविका सारिका बंगले, कमल भरारे, आरती गिरी, आरती कोरे, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, के. डी. पाटील, जालिंदर कोकणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. बसवराज पाटील म्हणाले की, भाजपा पक्षाने मला विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आमची मूळ जडणघडण लोहारा उमरगा तालुक्यामध्ये झाली. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. या पदाला योग्य न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही. हे सरकार लोकाभिमुख आहे. त्यामुळे या सरकारमधील लोकप्रतिनिधी म्हणून मी या मतदारसंघातील संस्था लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारांनी मला राज्यात सर्वाधिक मताने निवडून दिले आहे. त्यामुळे माझीही जबाबदारी वाढली आहे. लोहारा शहरातील जे प्रश्न आहेत ते नक्की सोडवू. कसलाही भेदभाव न करता काम करणार असल्याचे आ. बसवराज पाटील यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, नगरसेवक दिपक मुळे, हरी लोखंडे, संग्राम पाटील, बापू जट्टे, ब्रह्मानंद पाटील, बाबा सूर्यवंशी, शिवशंकर हत्तरगे, निकेश बचाटे, संतोष फावडे, मुरलीधर होनाळकर, सुयश दंडगुले, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, बाबा सुंबेकर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक नगरसेवक दिपक मुळे यांनी केले. सूत्रसंचालन मुकेश सोनकांबळे, हरी लोखंडे यांनी तर सतीश गिरी यांनी आभार मानले.








