Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

डाग – ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी, उस्मानाबादी बोलीतील पहिली कथा! भाग – २

admin by admin
26/02/2021
in आपला जिल्हा, महाराष्ट्र
A A
0

दाग दागिने करण्यासाठी काहीबाही विकून पैशांची साठवणूक करणारी रत्नाक्का… पोराने टाकले तरी त्याच्यासाठी झुरणारी माय… अठराविश्वे दारिद्र्य अनुभवणाऱ्या मराठवाड्यातील प्रत्येक गावात घडणारी ही वास्तव कथा आहे. या कथेचा दुसरा भाग –

लेखक- कलीम खाजामियाँ तांबोळी

(ही कथा, सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेत असून ती पूर्णतः काल्पनिक परंतु वास्तववादी आहे.)

२.
सुरेस, गावातला बगनारा. बुटका, बारक्या डोळ्याचा, गळ्यापतोर झिंज्या, गालावर बोचकरल्यासरकी खुन. त्यनं भुतासंगट कुस्ती खेळतय मन. एकदा डाव ऊलटा पडला आन ह्यला भुतानं बोचकारला मन. उजव्या हाताचं आंगट्यापसलं बोट सरळच व्हतं त्यच्या. वाकत न्हवतं. त्यचीबी आशीच कता. म्हारतीच्या देवळाम्होरी एक गोल गरगरीत गोटा व्हता. हीsssss मोट्टाच्या मोट्टा. कायतर मनबर वजन आसंल. कोन पैलवान उचलाचे बोकांडी दूनी हातात धरून. पर सुरेस ती एक्या बोटावर उचलाचा मन. आसा डोळे झाकाचा, कायतर मंतर मनाचा, गोट्याखाली बोट घालाचा आन मनाचा, ‘चल उट’ का गोटा ह्यच्या बोटावर! गरगरा फिराचा. एकदा आसाच गोटा उचलला, कोनतर आईबाई तितं हुबारली व्हती. ती बगुन त्या बाईनं सुरेसच्या पाया पडली मन. तिनं हयच्या पायाला हात लावली, तसा गोटा खाली पडला, कडमन बोटच मोडलं. बाई भाईर बसल्याली व्हती मन. तवापसून बोट आसं….
सक्काळी निस्त तोंड धिवून आक्का काकीकड गीली. काकीबी उरकूनच बसल्या व्हत्या. हिनं येताना बगीटल्या व्हत्या लांबूनच. जवळ आल्यावर काकी मनल्या, ‘च्या करू का गं माय उलीसा?’
‘नकू वं. सुरेसकुन आल्यावर करू मन.’
काकी गुडग्यावर हात ठिवून उटल्या. कवाड लावल्या. वरची कडी लावून त्यला कुलूप घाटल्या आन कुलपाचा हात कंबरंच्या पिशवीत ठिवल्या. वाटवर यीवून त्यनी इजाला हाक मारल्या.
‘इजा, ए माय..’
इजा मदुनंच मन्लि, ‘आले काकी.’
इजा भाईर आल्यावर काकीनी मनल्या, ‘हेव्क, आमी जरा खाली चाललाव. आशोकनं पानी आनला तर ठिव माय तुज्यात.’
बर मनून इजा मदी गीली.
काकी आन आक्का सुरेसच्या घरापशी आल्या. आंगनात कुत्रं बसलं व्हतं. त्यनं भुकला. भाईरच्या छपरात सुरेसची बायकु रेका सयपाक करूलालती. तिनं वाकून बगिटली, आन काकुला बगुन भाईर आली. डोक्यावरचा पदर नीट करून तिनं कुत्र्याला खवळूलाली.
‘ईssss कडू, तुला मानसं वळकू इनाते काय? भुकालाच.’
बाज घाटली, तिच्यावर घोंगडं टाकली.
‘बसा माय काकी. लई लांब आलाव आज.’
काकी टेकत मनल्या, ‘हं, मनले सुनंचा सौंसार कसा चाललाय बगावं..’
‘हाय की तुमचा आशीर्वाद.’ मनून रेका मदी गीली, तांब्या भरून पानी आनली. काकीच्या हातात तांब्या देत आक्काला मनली, ‘बऱ्याव का आक्का?’ दूगीच्या पाया पडून रेका पुना मदी गीली.
‘ठिवलाय माय देवानं. सुरेस न्हाई काय?’
‘हायते की. उंबरगावचे लोकं आलते बगाला, ती बसलीते. च्या ठिवते तवर व्हतय त्यंचं.’
रेकानं च्या करून आनली. तवर सुरेस आन ती उंबरगावचे लोकं बोलत आले भाईर. पावन्यानी सुरेसच्या पाया पडले आन पायात चप्पल सरकावले.
सुरेस त्यन्ला मन्ला, ‘च्या घ्याचो व्हतो..’
‘नगं आता, यीष्टी यीत्याय.’
‘बर, त्यवडा घास करा मग, अव.’ मनून सुरेसनं काकीला मन्ला,
‘आ.. कुनकड सवारी?’
‘आलाव बाबा तुज्याकडंच.’
‘या या, मदी या.’ मनून त्यनं वाकून बारक्या दरवाज्यातून घरात शिरला. काकी आन आक्काबी मग मदी गेल्या.
मदी सुरेसच्या ‘आई’ चा देवारा व्हता. आईला हिरवीगार साडी निशिवल्याली, लाल कापडाला चमकीच्या पट्टीचं झंपर. कपाळ भरून पिवळाधमक मळवट आन त्यच्यावर लालभडक कुक्काचा मोट्टाच्या मोट्टा गोल. पिवळं तोंड पुडी ठीवल्याल्या आरतीच्या दिव्यानं चमकून दिसूलालतं. जोत हालाली, कि जनू आई हासूलाली आसं वाटाचं. काळेभोर वटारल्याले डोळे, पन त्यचं भी वाटत न्हवतं. आई येनाऱ्या तिच्या भक्ताला जनू मनत व्हती,
‘लेकरा, माजी नजर हाय तुज्यावर…’
उदबत्या लावल्याल्या, त्यंच्या धुरानं आंदक दिसाल्त जरा. वास लई भारी याल्याला. पुडी निवद, तांब्यात हुबा नारळ, भवती इड्याची पानं, पाट्यावर पाच फळं. पुडी रांगूळीनं सस्तिक काडल्याला.. काकू आन आक्कानं आईच्या पाया पडल्या. आक्कानं क्याटलीत उलीसं गोडं तेल आन्ली व्हती ती आरतीत वतली, करंडीलं कुक्कु आईच्या पायावर लावली. हाळद आपल्या कपाळावर लावली, काकीला लावली. पुन्ना एकदा पाया पडली, पदरानं व्हट पुशीत म्हागं कुडाला टीकून बसली.
सुरेसनं डोळे झाकला, काकी आन आक्का हात जुडून बसल्या. घडीबर झाल्यावर त्यनं डोळे उगडला. आईच्या पाया पडला. आन आक्काकड बगून मन्ला,
‘पिंटूचं मनालाव हुई?’
आक्कानं पदर डोळ्याला लावला, रडू दाबलं आन कसंतर मन्ली,
‘हुंssss..’
काकीनी तिच्या डोक्यावून हात फिरीवल्या आन मन्ल्या,
‘गप माय, गप. रडूनी. आई हाय कि आपली. सुरेस काय मनालाय ती तर बग.’
भाईरचं आटपून हात पदराला पुशीत रेकाबी मदी आली. बाजूला बसून तीबी मन्ली,
‘आवो आक्का चांगलं व्हतंय वो सगळं, आपुन काय कुनाचा गुना केलाव, का कुनाचं वाईट वक्टं चितलाव? रडनुका माय.’
आक्का हाळूहाळू गप बसली. पदरानं डोळे पुसली. रेकानं पानी आन्ली, ती थोडं हातावर घिवून तोंड पुसली. नाकानं फुस्स फुस्स करून सुरेसला मन्ली,
‘का मनाल्याय आई?’
‘सगळं चांगलाय, पिंटू सुकशेल हाय. जरा फसलाय, त्यनं त्यला घरची वाट दिसंना झाल्याय. थुडी कसर बाकी हाय. सुटका व्हनाराय. आईचं लक्ष हाय. तिनं समदं बगुलाल्याय.’
‘कुटाय मन त्यनं.’ काकी मन्ल्या.
‘गेल्ता तितंच हाय, बांदलंय जरा त्यला, पन धोका न्हाई. येनाराय त्यनं हिकडं. माईला इसरला न्हाई. गाव हाय त्यच्या डोक्यात.’
‘काय दुकापात?’ आक्कानं काळजीनं इचारलं.
‘ह्या…. काय नाय तसलं.’
आक्कानं हात जूडली, आईच्या पाया पडली.
‘माय…. माजं लीकरू यीवू दी माय माज्यापशी. आमुशाला चालत तुज्या दरबारात यीवून खना-नारळानं वट्टी भरते तुजी.’
‘बगा आक्का, पिंटूभाऊ चांगल्यायते वो, कायतर इगीन आस्ल्याशिवी त्यनी आले नस्तिले.’ रेकानं मन्ली.
‘व्हय माय.’ मनून काकी उटल्या कंबरंच्या पिशवीतून धा रुपयची नोट काडून देवा-यात ठिवूलाल्या.
‘काकी, नगं वो..’ मनून सुरेस उटला आन काकीचे हात धरूलाला.
‘तुला दीनाव रे सुरेस, माज्या आईला दिवूलालेव म्या.’ मनून काकीनी नोट ठिवल्या आन पाया पडून जावूलाल्या.
सुरेस मन्ला, ‘दमा काकी, आंगुरा देतो.’ रेकाला त्यनं कागुद आनायला लावला. तिनं आनल्याल्या कागदाचे दोन टुकडे केला आन उदबतीची पडल्याली राक घिवून दोन पुड्या बांदला. आईच्या पायावर दूनी पुड्या ठिवला, आन डोळे झाकून, हात जूडून तोंडातल्या तोंडात कायतर मन्ला. पुड्या उचलून दूगीच्या हातात दिला आन मन्ला,
‘जावा बिनघुरी.’
पुडी कपाळाला लावून आक्कानं ती कंबरंच्या पिशवीत ठिवली आणि भाईर आली.
रेका मन्ली, ‘जीवून जायचो व्हतो, सैपाक झालाय.’
‘नगं माय, येतेव पुना. मानकुचं खळाय आज. जाते पसाबर आनाला.’
बर मनून काकीबी निगाल्या…..

घरी यीवून आक्कानं देवा-यात आंगुरा ठिवली. एक धडपा आन खाताच्या पोत्याची शिवल्याली पिशवी घीटली. पायात झिजल्याली शिलपर घाटली. भाईर यीवून कवाड लूटून घिवून कुलूप लावली. खुट्टीची शीळी सूडली. मालकीनीला बगून शीळी ब्यां ब्यां करून उटली.. आन आक्काच्या म्हागं म्हागं जावूलाली. आक्का चटा चटा शिलपर वाजवीत पांदीच्या वाटंला लागली. डोक्यात इचार चालू व्हते… माजा पिंट्या सुकात हाय, येनाराय त्यनं… त्यला हितंच कायतर दुकान फिकान काड मनू. वकीलाकड घिवून जावू, त्यनी समजावून सांगतिले त्यला बराबर… पाय पटापटा उचलाल्ते गरबडीनं मानकुचं शेत जवळ कराल्ती आक्का. आन त्यवड्यात तिच्या पायात कायतर घुसलं. कळ पार डोक्यात शिरली. स्स्स्सस्स्स करून आक्का खाली बसली, पटमन पाय उचलून बगूलाली. तर फाटक्या चपलीतून एक येड्या बाबळीचा दांडगा काटा पायात शिरल्याला, पार टाचंच्या हाडकाला जावून भिडल्याला… आक्का त्यला उपसुलाली तर निगता निगंना… कळीनं तिच्या डोक्यात मुंग्याच याल्या. धरून जोरास वडली, तसं भळमन लालभडक रगत टाचंतून भाईर आलं आन तिच्या डोळ्यातून टपाटप पानी यालालं………….
क्रमशः

Tags: डाग
Previous Post

महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर शाखेच्या वतीने स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप

Next Post

जिल्हा बँक, तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्याच्या अडचणी संदर्भात चेअरमन सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली सहकार मंत्री पाटील यांची भेट

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

जिल्हा बँक, तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्याच्या अडचणी संदर्भात चेअरमन सुरेश दाजी बिराजदार यांनी घेतली सहकार मंत्री पाटील यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's