Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी दिली माकणी येथील आयसोलेशन केंद्रास भेट – केंद्राची पाहणी करून घेतली बैठक

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी शुक्रवारी ( दि. ७) भेट देऊन प्रमुख पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, उपसरपंच व गाव प्रमुखांसह बैठक घेतली.

\"\"
यावेळी औषध पुरवठा, तपासणी, जेवण, स्वच्छता यासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेळेचे नियोजन इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली. या आयसोलेशन केंद्रात परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असून सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याशी चर्चा करून पोलीस कर्मचारी उपलब्ध करणेबाबत सुचवले.

\"\"
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर (नाना) साठे, सरपंच विठठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे,  ग्रामपंचायत सदस्य सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, शिवाजी साठे सर, पंडित ढोणे, उमाशंकर कलशेट्टी, गोविंद चव्हाण, गोविंद साठे, विकास भोरे, वैद्यकीय अधिकारी संतोष मनाळे, गोपाळ ढोणे, अच्युत चिकुंद्रे, पोपट पवार, ओंकार साठे,  बाळू कांबळे, सुभाष आळंगे आदी उपस्थित होते.

\"\"

Tags: आयसोलेशन केंद्रास भेटजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारमाकणी
Previous Post

लोहारा तालुक्यात नवीन ७८ रुग्णांची भर – दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे आवश्यक

Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले – नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्याकडून शुक्रवारी स्वीकारला पदभार

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रशासकपदी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले - नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्याकडून शुक्रवारी स्वीकारला पदभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!