Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी केला कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा सत्कार – कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

admin by admin
12/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या कोविड १९ च्या भीषण परिस्थितीत आरोग्य कर्मचारी मोठ्या जिद्दीने काम करत रुग्णांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने तहसीलदार संतोष रुईकर यांनी सोमवारी ( दि. १०) आयटीआय येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. तसेच तेथील रुग्णांची विचारपूस केली. व कोरोनामुक्त झालेल्यांचा सत्कार केला.
मागील वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी रुग्ण आढळून आला की, त्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण व्हायचे. परंतु सद्यपरिस्थितीत सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे, त्यांना काम करताना प्रोत्साहन मिळावे याच उद्देशाने लोहाऱ्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी सोमवारी ( दि. १०) शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन तिथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवक, वार्डबॉय, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचाही सत्कार केला. तसेच तेथील रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मगर, आरोग्य कर्मचारी खंडू शिंदे, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, परिचारिका सपना सगट, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.


सद्यस्थितीत कोरोनाबद्दल खूप मोठी भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत वैद्यकीय उपचारासोबत मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे तहसीलदार रुईकर यांनी राबविलेला हा उपक्रम आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा, प्रोत्साहन निर्माण करण्यास मदत करणारा ठरेल.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कर्मचाऱ्यांचा सत्कारलोहारा कोविड केअर सेंटरलोहारा तहसीलदारसंतोष रुईकर
Previous Post

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाच्या आरोग्य सेवेला सलाम – आमदार ज्ञानराज चौगुले – रोटरी क्लब मुंबई व स्पर्श रुग्णालयाच्या वतीने औषधी किटचे वाटप

Next Post

लोहारा तालुक्यात वैद्यकीय उपाययोजना करण्यात याव्यात – राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यात वैद्यकीय उपाययोजना करण्यात याव्यात - राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's