Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध – पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करत दिले निवेदन – दरवाढ कमी करण्याची पंतप्रधान यांच्याकडे केली मागणी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
वाढत्या पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीचा निषेध करत ही दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोमवारी ( दि. १७) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, देशात पेट्रोल डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोल तर शंभर रुपयांच्या वर गेले आहे. त्यात आणखी एक संकट निर्माण झाले आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. जे डीएपी खत ११८५ रुपयांना मिळत होते त्याची किंमत आता १९०० रुपये झाली आहे. याप्रमाणे अन्य खतांच्याही किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही या दरवाढीचा निषेध करत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे तसेच ही दरवाढ कमी करावी व शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.

\"\"

यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटूकणे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, शहराध्यक्ष आयुब शेख, बहादुर मोमीन, नवाज सय्यद, बालाजी मेनकुदळे, संजय जाधव, सचिन रनखांब, स्वप्निल माटे उपस्थित होते.

Tags: दरवाढ निषेधलोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा – धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे – परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना – पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क

Next Post

लोहारा (खु) येथे ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप – गावातील युवकांनी लोकसहभागातून राबविला स्तुत्य उपक्रम

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा (खु) येथे ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप - गावातील युवकांनी लोकसहभागातून राबविला स्तुत्य उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!