Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा (खु) येथे ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप – गावातील युवकांनी लोकसहभागातून राबविला स्तुत्य उपक्रम

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुक्यातील लोहारा (खु) येथील युवकांनी लोकसहभागातून गावातील ३०० कुटुंबांना स्टीमर वाटपाचा उपक्रम राबविला. मंगळवारी ( दि. १८) हा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील लोहारा (खु) गावातील तरुण, अबालवृधानी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन गावात संसर्ग वाढू दिला नाही. अजूनही कोरोनाचे हे संकट दूर झाले नाही. त्यामुळे आणखीन सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गावातील युवकांनी स्टीमरचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी ( दि. १८) नागरिकांना कोरोना संकटापासुन सुरक्षित राहण्यासाठी व आरोग्याची काळजी घेण्यासाठी गावातील गरजू ३०० कुटुंबांना स्टीमरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ए. अकेले, सरपंच सचिन रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, कृषी सहाय्यक निळकंठ पाटील, ग्रामसेवक जी. डी. कोकाटे, पोलिस पाटील बीरूदेव सुर्यवंशी, विकास सोसायटीचे चेअरमन मुकुंद इंगळे, माजी चेअरमन भास्कर रसाळ, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

\"\"
यावेळी लोकसहभाग व नाविन्यपुर्ण संकल्पनेतून मदत करण्याचे आवाहन बालाजी सूर्यवंशी यांनी तरुणांना केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण सुर्यवंशी, अजय रसाळ, सचिन बाळू रसाळ, खंडेराव मुरटे, सुग्रीव पाटील, संभाजी पाटील, विकास प्रकाश पाटील, श्रीहरी रसाळ यांच्यासह स्वप्नपुर्ती समूहचे अरविंद रसाळ, राजमुद्रा समुहचे अर्जुन रसाळ, हणमंत मुरटे, अजय रसाळ, रोहण जमादार, व सह्याद्री समुहाचे भास्कर रसाळ, गणेश पाटील यांनी पुढाकार घेतला. तसेच नितिन सूर्यवंशी, खंडू आरगड़े, व्यंकटेश सूर्यवंशी, प्रकाश हरिश्चंद्र रसाळ, नरहरी पाटील, प्रल्हाद रसाळ, शिवाजी पाटील, शिवाजी रसाळ, बालाजी पाटील, शिवशंकर लोखंडे, अमर जाधव, आप्पाराव सुर्यवंशी आदींनी विशेष सहकार्य केले.

\"\"

Tags: लोहारा(खु.)स्टीमर वाटप
Previous Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध – पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करत दिले निवेदन – दरवाढ कमी करण्याची पंतप्रधान यांच्याकडे केली मागणी

Next Post

कोविड रुग्णांसाठीच्या रुग्णवाहिकांना रिलायन्स समूहाद्वारे मोफत इंधन – रिलायन्स पेट्रोलपंप उमरगा येथून झाला शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

कोविड रुग्णांसाठीच्या रुग्णवाहिकांना रिलायन्स समूहाद्वारे मोफत इंधन - रिलायन्स पेट्रोलपंप उमरगा येथून झाला शुभारंभ - आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!