वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत चालु असलेल्या दोन्ही कोविड केअर सेंटरला कै. कलावती बाबुराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या वतीने स्पिकर, माईक व त्यासाठी लागणारे मशीन असे दोन साऊंड सिस्टीम तसेच आशा कार्यकर्तींना सेफ्टी किट देण्यात आले आहेत. रविवारी ( दि.२३) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास देण्यात आले.
लोहारा ग्रामीण रुग्णालया अंतर्गत सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाला औषध घेणे, रुग्णाची तपासणी करणे यासाठी त्यांना गर्दि न करता बोलवण्यासाठी व ग्रामीण रुग्णालयाला शहरात व इतर गावामध्ये लसिकरण, ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा गावोगावी पोहचविण्यासाठी लागणारे स्पिकर, माईक व त्यासाठी लागणाऱ्या मशीन आवश्यकता होती. ग्रामीण रुग्णालयाची ही गरज लक्षात घेऊन कै. कलावती बाबुराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ युवासेना तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार व बिराजदार कुटुंबाच्या वतीने रविवारी (दि. २३) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांना देण्यात आले. या सिस्टीमचा वापर कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना भजन, किर्तन ऐकण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी होईल असे प्रतिपादन आमदार चौगुले यांनी यावेळी केले. तसेच आपल्या जिवाची पर्वा न करता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावुन घरोघरी कोविड या आजाराविषयी जनजागृती करत आशा कार्यकर्त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा काळात त्यांना आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्याकडून सेफ्टी किट देण्यात आले. याचेही वितरण आमदार चौगुले यांच्या हस्ते आशा कार्यकर्तींना करण्यात आले. या किट मध्ये वाफ घेण्यासाठी वेपोराईझर, मशिन, सॅनिटायझर, मास्क व पावसाळ्यात आवश्यक असलेली छत्री आदी साहित्याचा समावेश आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, जगदीश लांडगे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, माजी पं.स. सदस्य सुधिर घोडके, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सतिश गिरी, आमिन सुंबेकर, शहाजी जाधव, भरत सुतार, प्रेम लांडगे, दत्ता मोरे यांच्यासह शहरातील आशा कार्यकर्त्या, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या दरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ग्रामीण रूग्णालयातील रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच उपस्थित अधिकारी , कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला. तसेच कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोहारा शहर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ ही आमदार चौगुले यांनी केला.
No Result
View All Result
error: Content is protected !!