वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे दुकानातील उपलब्ध बियाणे घेऊन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
लोहारा तालुक्यात सध्या विविध बियाणे कंपन्याकडून सोयाबीन बियाणे प्राप्त होत असून गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी उगवण क्षमता कमी झाल्याची तक्रारी केल्यामुळे कृषी सेवा केंद्र धारक व पंचायत समिती कृषि विभाग मार्फत प्राप्त सोयाबीन बियान्याची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. तालुक्यातील सास्तुर येथील योगेश कृषी सेवा केंद्र येथे पंचायत समिती लोहाराचे कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी दुकानातील उपलब्ध बियाणे घेऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच शेतकऱ्यांना घरचे सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरणेबाबत व सोयाबीन उगवण क्षमता तपासणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.