वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
इंधन दरवाढ व महागाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कँप ते विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथ पर्यंत सायकल मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभयजी छाजेड, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संजयजी बालगुडे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दत्ताजी बहिरट, कमलताई व्यवहारे, अमीर शेख, गोपाल तिवारी, आबा बागुल, अविनाश बागवे, वीरेंद्र किराड, लता ताई राजगुरू, रवींद्र धंगेकर, चंदूशेठ कदम, अजित दरेकर, सुजाताताई शेट्टी, रफिक शेख, मनीष आनंद, मंजूर शेख, मुखतार शेख, सुनील शिंदे, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाठ, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण राणभारे, प्रकाश पवार, यासिन शेख, बाळासाहेब अमराळे, साहिल केदारी, शिलार रतनगिरे, विठ्ठल गायकवाड व सर्व ब्लॉक अध्यक्ष, शहर काँग्रेस पदाधिकारी,सर्व फ्रंटल व सेल पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक उपस्थीत होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार केला. उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करण्यात आल्याचे आंदोलकांनी म्हणले आहे.






