Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत – राष्ट्रवादी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२०) हे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हणले आहे की, सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या व्यवसायावर शासनाने निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश ठिकाणी अवैध दारू विक्री, जुगार, मटका आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. तरीही राजरोसपणे हे अवैध धंदे सुरू आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केलेली असतानाही शेजारील कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणुन सर्रास विक्री केली जात आहे. या सर्व अवैध धंदयाना पोलिसांचा छुपा पाठिंबा आहे की काय अशी लोकांमध्ये चर्चा आहे. गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या चोरीच्या घटनांतील आरोपींचा शोध लागत नाही. आज अनेक गावांमध्ये राजरोसपणे खुलेआम पणे अवैध दारूची दुकाने थाठुन लोकांचे संसार उद्धवस्त केले जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच महिलांवरील झालेल्या अन्यायाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात लोक आले तर पोलीस ठाण्याचे अधिकारी त्या व्यक्तीला पोलीस ठाण्याचा संबंध नसलेल्या खासगी व्यक्तीकडे पाठवत असलेच्या तक्रारी येत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे.\"\"त्यामुळे लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत गावात सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. तसेच तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यातच न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, राजेंद्र कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, प्रकाश भगत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन, नवाज सय्यद, स्वप्नील माटे, मनोज देशपांडे, तिरुपती चव्हाण आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा तालुक्यात मंगळवारी (दि.20) 9 रुग्णांची भर

Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा (पूर्व) येथे स्वयंम रोजगार मेळावा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा (पूर्व) येथे स्वयंम रोजगार मेळावा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!