Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीची सुरुवात करण्यात आली आहे.\"\"शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात ११ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड, खा. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते किरण गायकवाड यांच्या शुभहस्ते युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील एकोंडी, राजेगाव, होळी, रेबे चिंचोली, मुर्शदपुर, धानुरी,आनंदनगर तांडा खेड या सात ठिकाणी युवासेना शाखांचे उद्घघाटन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवानेते किरण गायकवाड यांनी शिवसैनिक व युवासैनिकांना मार्गदर्शन केले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संघटनात्मक बांधणीची सुरुवात या माध्यमातुन करण्यात आली. ठाकरे सरकारच्या काळातील कार्य, योजना, कोरोना काळातील शिवसेनेचे कार्य, पिकविमा, पिक कर्जाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यास तत्पर राहावे असे आवाहन किरण गायकवाड यांनी केले. युवासैनिकांनी सामान्य नागरीकांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी केले. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखाप्रमुख, सचिव , संघटक, कोषाध्यक्ष, सोशलमिडीयाप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उदतपुरच्या सरपंच रंजना बालाजी पवार, उपसरपंच दगडु दलाल, ग्रा.पं.सदस्य किसन बनसोडे, तुकाराम पवार यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला. तसेच सास्तुर येथे शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना विधानसभा अध्यक्ष शरद पवार, विभागप्रमुख बालेपीर शेख, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, राजेगावचे सरपंच सुरेश देशमुख, कास्तीचे परवेझ तांबोळी, होळीचे माजी सरपंच व्यंकट माळी, मुर्शदपुर शालेय शिक्षण अध्यक्ष अनिल बलसुरे, महेबुब फकिर, महादेव धारोळे, सचिन देशमुख, मुरलीधर पवार, बाजार समिती संचालक आनंदराव सुर्यवंशी, उप तालुका प्रमुख प्रदिप मोरे, अविनाश राठोड, बालाजी मडुळे, आबा पुरणे, राजाभाऊ मोरे, दत्ता मोरे, प्रेम लांडगे, नितिन जाधव, युवासेना शाखाप्रमुख करण बाबळसुरे, विशाल सुरवसे, आकाश जाधव, शेखर पाटिल, दत्ता जाधव, अतुल मोरे, शिवराम सुरवसे यासह युवासेना, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा संपन्न – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Next Post

छावा संघटना काढणार लोकमंगल कारखान्यावर मोर्चा – ऊसाचे बिल लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

छावा संघटना काढणार लोकमंगल कारखान्यावर मोर्चा - ऊसाचे बिल लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!