वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुढील २४ तासात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात पुढील २४ तासात सर्वत्र मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.




