वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिला कमलाकर स्वामी-हिरेमठ यांना नुकताच सोलापूर येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेटृटी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचित्रा थळगे, राजश्री तडकासे, श्रीदेवी येळमेले, रेणुका हबु, रेणुका हिरेमठ, वीरशैव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, मल्लीनाथ परमशेट्टी, अरुणा हनमगावकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. डॉ. शिला स्वामी या श्री माधवराव पाटील महाविद्यालयात गेल्या ३१ वर्षापासून इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत शोधपत्रिकेत संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्या मराठवाडा इतिहास परिषद कार्यकारिणी सदस्या, इतिहास अभ्यास मंडळ सदस्या, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अशा विविध विद्यापीठ समित्यावर कार्य करीत आहे. विविध कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रामध्ये सत्राध्याक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांची विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. महिला दक्षता समिती, तक्रार निवारण समितीसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे. रस्तासुरक्षा अभियान, बेटी बचाव-बेटी पढाव, हुंडा बंदी, बालविवाह, महिला जाणीवजागर, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, स्वच्छता अभियान, मतदान जागृती अभिमान अशा विविध क्षेत्रातील योगदानाबद्ल राज्य, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार, आदर्श शिक्षक, आदर्श पतिपत्नी पुरस्कार त्यांना यापुर्वी मिळालेले आहेत. त्यांना नुकताच नारीशक्ती सन्मान पुरस्काराबद्दल प्रा. डॉ. कनाडे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुशील मठपती, प्रा. मुकूंद धुळेकर, डॉ. किरण राजपूत, प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. अरूण बावा, प्राचार्य. डॉ. राजशेखर हिरेमठ, डॉ. दिपा सावळे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, डॉ. पोर्णिमा स्वामी आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.