Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम – झेंडूच्या ऑनलाईन विक्रीतून मिळाला हजारो रुपयांचा नफा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकरी चंद्रहर्ष जाधव हे पुणे येथील अरीहंत कॉलेज ऑफ़ आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असुन सध्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या गावी वडिलांना मदत म्हणून शेती करीत आहेत. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती न करता काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाच गुंठे जमीनीवर झेंडूच्या पिवळ्या व भगव्या रंगाच्या फुलांची शेती केली. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या सणामध्ये झेंडूच्या फुलांना खुप महत्व आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.\"\"परंतू सोलापूर, लातुर, उमरगा अशा बाजारपेठेत फुले नेऊन विक्री करण्यासाठी लागणारा वाहतुक खर्च, बाजारपेठेत मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना पेलवत नाही. म्हणून थेट ग्राहकांना एका क्लिकवर माल जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे मित्र आय. टी. इंजिनियर कृष्णा सरवदे यांच्या मदतीने ऑनलाईन लिंक तयार करुन सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर आपल्या व्यवसायाची जाहिरात केली व शेताच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत फुले कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या डिजिटल युगामध्ये एका क्लिक वर घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्या झपाट्याने मोठ्या होत आहेत. काळाला अनुसरून शेतकरी सुद्धा मागे रहायला नको असा विचार केला व या उपक्रमाला ग्राहकांचा आफाट प्रतिसादही लाभला व भावही चांगला लागल्यामुळे व कमी खर्चात कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळाल्याने चांगला नफा मिळाला. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी त्यांचे अभिनंदन करीत असुन युवा शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.\"\"

Tags: अभिनव उपक्रमझेंडूची विक्रीशेतकरी
Previous Post

रोटरीच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले यांना हिरकणी पुरस्कार

Next Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन – मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन - मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!