Tuesday, November 3, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हा जिल्हा बँकेचा पुनर्जन्म असून आगामी काळात शेतकऱ्यांना मदत करणार – प्रा. सुरेश बिराजदार – जिल्हा बँकेला सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल चेअरमन, गटसचिव, कर्मचाऱ्यांनी केला सत्कार

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तेरणा कारखाना प्रॉव्हीडेंट फंड कार्यालयाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ थकित रकमेसाठी कारखाना जप्त करून लिलावाला काढला होता. त्यास उच्च न्यायालयात स्थगिती घेऊन गेल्या पाच वर्षापासून डीआरटी, डीआरएटी, उच्च न्यायालय या सर्व न्यायालयीन प्रक्रियेचा लढा अव्याहत देऊन सर्व अडथळे पार करत जिल्हा बँक सक्षम करण्यासाठी यश मिळाले आहे . हजारो लोकांच्या ठेवी या बँकेत आहेत त्यांना व भविष्यात शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेती कर्ज मिळवण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. हा जिल्हा बँकेचा पुनर्जन्म असून आगामी काळात शेतकऱ्यांना मदत करणार असे मत जिल्हा बॅंकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्याने आगामी काळात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव मिळण्यास मदत होणार आहे. कारखाने भाडेतत्वावर देऊन जिल्हा बँकेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी मागील चार ते पाच वर्षापासून अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्या बद्दल उमरगा लोहारा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन, गटसचिव , व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.\"\"जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या व जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा असणारा तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखाना सुरु होणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. बिराजदार व संचालक मंडळाने मागील चार वर्षापूर्वी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची भेट घेवुन प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असुन तेरणा व तुळजाभवाणी साखर कारखाने दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. त्यामुळे डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेत गतवैभव प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. बिराजदार यांनी केलेल्या या अथक प्रयत्नाना यश आल्याबद्दल उमरगा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व गट सचिवांनी चेअरमन प्रा. बिराजदार व व्हा.चेअरमन कैलास शिंदे यांचा सोमवारी दि .२९ रोजी उमरगा येथे सत्कार केला . यावेळी राम जाधव ,सुनील साळुंके ,प्रताप महाराज, नेताजी कवठे, भीमा स्वामी, बालाजी साळुंके, सुभाष गायकवाड, शमशोद्दीन जमादार ,प्रदीप गावकरे ,सचिन केशवशेट्टी, विजय पाटील, लिंबराज पाटील, प्रदीप पाटील, बाळासाहेब बुंदगे, बाळासाहेब बिराजदार, सचिन रणखांब, विजय सगर, विजय जगताप, ओम गायकवाड, शिवाजी उपासे, काशिनाथ गायकवाड, दत्ता वाडीकर ,सतीश जाधव, देविदास शिंदे ,विठ्ठल औरादे, शिवाजी पाटील, संजय चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकचेअरमन सुरेशदाजी बिराजदार
Previous Post

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट – प्रशासनाकडून जय्यत तयारी

Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणुकीकरिता पहिल्या दिवशी नऊ नामनिर्देशनपत्र दाखल

Related Posts

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणुकीकरिता पहिल्या दिवशी नऊ नामनिर्देशनपत्र दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!