Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील नागुर येथे स्पर्श रुग्णालयाच्या वतीने बीपी, शुगर तपासणी शिबिर संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्राईड इंडिया स्पर्शच्या चार अद्ययावत फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील १२६ गावामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. लोहारा तालुक्यातील नागुर येथे मोफत बिपी, शुगर तपासणी, एचआयव्ही तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे प्रास्ताविक अच्युत आदटराव यांनी केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना आपल्या आजाराचे निदान उशिरा झाल्याने भविष्यात अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. प्रकल्पाच्या माध्यमातून ३० पेक्षा अधिक वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत बिपी/शुगर तपासणी करून समस्याग्रस्त नागरिकांना समुपदेशन, सल्ला व उपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येते.\"\"यावेळी डॉ. प्रशांत जाधव नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, अजूनही कोव्हीड हा आजार आपल्यातून गेलेला नाही. या विषाणूने आपले स्वरूप बदलले असून त्याची प्रसार करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा जास्त आहे. ओमीक्रॉन या व्हेरियंट वर नियंत्रण मिळवायचे असेल तर गावातील १०० टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी लोकांनी मास्कचा नियमित वापर, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर आणि वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या सवयी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आचरणात आणनेही गरज बनली आहे. आभार सरपंच गजेंद्र जावळे यांनी मानले व जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर शिबिरामध्ये एकूण ४०० नागरिकांची बिपी शुगर तपासणी, २५० लोकांची एचआयव्ही तपासणी तर १७० लोकांना कोव्हीडची लस देण्यात आली. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. पल्लवी गायकवाड, सुपरवायझर किरण कदम, पल्लवी औटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ छबु माने, अंजुम इनामदार, फार्मासिस्ट सविता क्षीरसागर, स्टाफ नर्स पल्लवी सोनकांबळे, समुपदेशक प्रवीण कांबळे, बालाजी क्षीरसागर, आशा कार्यकर्ती जयश्री सोनवणे, ए व्ही रोडगे,पी बी माने, राजेंद्र थोरात, गीतांजली लोभे यांनी परिश्रम घेतले.

Tags: स्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १० जणांची माघार

Next Post

खरिप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या अन्यथा आंदोलन करू – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

खरिप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या अन्यथा आंदोलन करू - संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!