वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्र पदविकेच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सत्या दीपथा फार्मास्युटिकल कंपनी हुमनाबाद येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली.
महाविद्यालयाचे प्राचार्य कवलजीत बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे हित, सर्वांगीण विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कंपनीच्या सर्व प्रकारच्या कामकाजा विषयी तसेच कंपनी मध्ये तयार होणारे प्रॉडक्ट याविषयी माहिती देण्यात आले. कंपनीचा सर्व परिसर विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला यावेळी प्रा. सुरज भगत, प्राध्यापिका दिपाली भगत, प्रा. स्नेहल चनशेट्टी, वैभव मोरे व महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.