Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे…… गोविंद पाटील – मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

admin by admin
30/03/2022
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तरुणांच्या बाह्य व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हा अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरामध्ये सहभागी झालेल्या शिबीरांमधून होतो. अशी शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले.
गणेशनगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘ ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक शिबीर ‘ च्या समारोप कार्यक्रमात बुधवार (ता. ३०) प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरूजी होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतिश पवार, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, मुख्याध्यापक सुभाष राठोड, उपसरपंच, तंटामुकत समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संध्या डांगे, एनएसएसचे विद्यार्थी प्रतिनिधी योगेश पांचाळ, अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, अंजली स्वामी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना गोविंद पाटील म्हणाले की, महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच बाह्य शिक्षण माणसाला व्यावहारीक जीवन शिकविते. यामुळे आपले व्यक्तीमत्व सतत घडत असते. आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळून जगण्याचा एक आदर्श मार्ग सापडतो. अशा शिबीरांमधून खुप शिकण्यासारखे असून त्याचा पुरेपुरे उपयोग तरुणांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी चांगला संकल्प करुन स्वतःचा विकास करुन घ्यावा असे आवाहन केले. यावेळी रंगनाथ जगताप, अमोल कटके व भाग्यश्री पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट सहभागाबद्ल सोनाली चव्हाण, दिक्षीवंत जाधव, शितल कटके, सोनू चव्हाण, सोनाली जाधव, श्वेताराणी कसनकर, नामदेव शिंदे, यशोदा बोडरे, आकाश पांचाळ, पुजा शिंदे, प्राजक्ता थोरात, सतिश महिंद्रकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. लखन पवार, प्रा. सचिन राजमाने, प्रा. अशोक बावगे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुशील मठपती, प्रा. भूषण पाताळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर, दत्ता कुंभार आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी आभार मानले.

Tags: राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
Previous Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Next Post

उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर – जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Related Posts

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश
उमरगा तालुका

लातूर – गुलबर्गा रोडवर ट्रक व आटोचा अपघात; अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने चालकाला बाहेर काढण्यात यश

05/04/2025
दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड
उमरगा तालुका

दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

21/01/2025
राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
उमरगा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

14/01/2025
वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे
उमरगा तालुका

वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली – प्रा. डॉ. महेश मोटे

13/01/2025
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल
आपला जिल्हा

वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल

10/01/2025
Next Post

उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर - जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's