वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
बकरी ईदच्या अनुषंगाने लोहारा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.६) रूट मार्च काढला. पोलीस ठाण्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदंबा मंदिर पर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, सुरेश नरवडे, पोलीस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे यांच्यासह लोहारा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी व जलद प्रतिसाद पथक सहभागी झाले होते. सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत हा रूट मार्च काढण्यात आला.