Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात रविवारी (दि. २१) लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागन्ना वकील हे होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, गोविंदराव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

\"\"
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बालाजी जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चिकित्सक वृत्ती अंगिकारून अभ्यास केला पाहिजे. तसेच अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन केले पाहिजे. तुम्ही शिक्षण घेऊन मिळविलेल्या पदाचा उपयोग आपल्या भागातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनो शिक्षण घेत असताना कुठेही कमी पडू नका. शिक्षण घेत असताना परिश्रम करा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की, मुलींनो शिक्षण घेत असताना संघर्ष करावा लागत असतो. त्यामुळे न डगमगता संघर्ष करावा. कारण ज्यावेळी संघर्ष करावा लागतो त्या संघर्षानंतर मिळालेले यश हे खूप मोठे असते असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात तालुक्यातील २३ शाळेतील दहावी परीक्षेत शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या एकूण ४६ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

\"\" \"\"
या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शरिफा सय्यद, किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवंडकर, नगरसेवक जालिंदर कोकणे, हाजी बाबा शेख, ऍड. दादासाहेब जानकर, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, प्रकाश भगत, शमशोद्दीन जमादार, अफसर मुल्ला, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, महेश स्वामी, प्रवीण पाटील, दयानंद स्वामी, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, वैजिनाथ कागे, प्रशांत कार्ले, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, गजानन मिटकरी, सचिन रणखांब, लक्ष्मण बिराजदार, व्यंकट राजपूत आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन परमेश्वर सूर्यवंशी यांनी तर विजय लोमटे यांनी आभार मानले.

\"\"

Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कारजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारडॉ. बालाजी जाधववाढदिवस
Previous Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात देशपांडे फाउंडेशनबाबत करिअर मार्गदर्शन संपन्न

Next Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील अतिवृष्टी, शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी – उमरगा व लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- आ. ज्ञानराज चौगुले यांची मागणी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली उमरगा तालुक्यातील कवठा शिवारातील अतिवृष्टी, शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी - उमरगा व लोहारा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा- आ. ज्ञानराज चौगुले यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!