Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल – मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला दिली भेट

by admin
in महाराष्ट्र
A A
0

मुंबई :
सण-उत्सव,सुट्ट्यांच्या काळात मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. आज साताऱ्याहून मुंबईकडे परतत असताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

\"\"

प्रवासादरम्यान त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला. यावेळी त्यांनी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी. अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घेवून वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे आठवडी बाजाराचा शुभारंभ

Next Post

हायस्कुल लोहारा शाळेचा विद्यार्थी ओमकार संजय स्वामी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

हायस्कुल लोहारा शाळेचा विद्यार्थी ओमकार संजय स्वामी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!