Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या हॉटेलवर छापा – चार महिलांची केली सुटका

by admin
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 16.09.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यालगत ‘हॉटेल सरिता’ चे चालक आपल्या हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन रात्री पावणे आठ वाजणेच्या सुमारास ‘हॉटेल सरिता’ येथे छापा टाकला असता हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये 4 प्रौढ मिहिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक एक 49 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) असुन ती त्या 4 महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या हॉटेल चालक महिलेस अटक करुन तीच्या ताब्यातील एक मोबाईल फोन व 4,500 ₹ रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या 4 महिलांची सुटका करुन हॉटेल चालक महिलेसह हॉटेल मालक या दोघांविरुध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 287 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2) सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, पोनि- श्री. के.एस. पटेल, श्री. उस्मान शेख, पोउपनि- श्री. चाटे, सपोफौ- कऱ्हाळे, महिला पोहेकॉ- पुरी, पोना- सांगळे, राऊत, शेख, महिला पोना- जाधव, पोकॉ- अंभुरे, खांडेकर, साळुंके, जमादार, पाडे यांच्या पथकाने केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) चे प्रभारी पोनि- श्री. के.एस. पटेल हे करत आहेत.

Previous Post

हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थ्यांनी मारली बाजी – किंग कोब्रा गणेश मंडळ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

Next Post

मोठी बातमी ! मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला! – मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार ?

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

मोठी बातमी ! मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला! - मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!