वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापुर पाई चालत जाणाऱ्या भक्तांसाठी लोहारा माकणी रोडवरील लोकमंगल साखर कारखाना पेट्रोल पंपा शेजारी अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.२६) पोलिस उपनिरीक्षक रविकुमार पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश साळुंके यांच्या हस्ते तुळजाभवानीची आरती करुन करण्यात आला.
यावेळी दै. पुण्यनगरीचे विभागीय प्रतिनिधी बालाजी वडजे, मनसेचे लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, मनविसेचे मराठवाडा उपाध्यक्ष किरण कांबळे, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, विनोद मुसांडे, हराळीचे उपसरपंच रविंद्र सुर्यवंशी, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार घोगरे, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे, लोहारा तालुका उपाध्यक्ष दत्ता शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रदिप जाधव, अविनाश राठोड, राजेंद्र माळी, बालाजी साळुंके, पंडीत साळुंके, रमेश जाधव आदी उपस्थित होते.