लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील विमलबाई कासार ( ९५) यांचे शुक्रवारी (दि.१४) सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सास्तुर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सास्तुरचे सरपंच यशवंत कासार यांच्या त्या आजी होत्या.