Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे ७ लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट – चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा पाचवा गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात

by admin
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0

उमरगा : तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना (संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.) च्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार, सचिन शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी सभासद व संचालकांच्या हस्ते गुरुवारी दि.२७ रोजी संपन्न झाला.
उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकरी सभासद व संचालकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे संचालक सुनील माने यांच्या हस्ते गव्हानीचे पूजन करून सर्व संचालक व शेतकरी सभासदांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी साडेचार लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत परिसरातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक २५०० रुपये विक्रमी भाव दिला आहे. त्यामुळे भाऊसाहेब बिराजदार कारखान्यास ऊस देण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत.

\"\"
यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असून कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले आहे. गुरुवारी (दि. २७) कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावर्षी सात लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी यावेळी सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार, क्युनर्जी इंडस्ट्रीजचे संचालक सचिन शिनगारे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद्माकरराव हराळकर, संचालक सुनील माने, गोविंदराव साळुंके, राहुल पाटील, युवराज कदम, इमाम पटेल, तुकाराम बिराजदार, किसन पाटील, अभिजीत माडीवाले, आर .डी. माने, व्यंकटराव सोनवणे, बब्रुवान औटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाबा जाफरी, भीमा स्वामी, गोविंदराव पवार, नानाराव भोसले, बाळासाहेब स्वामी, शमशोद्दीन जमादार, नेताजी कवठे, दत्ता इंगळे, नाना माने, डॉ. फरीद अत्तार, रमेश बिराजदार, माधवराव पाटील, प्रकाश भगत, अजित पाटील, विष्णु भगत, प्रदीप पाटील, बाळू बिराजदार, प्रताप महाराज, संदिपान पाटील, ज्योतीराम औरादे, दिगंबर औरादे, प्रकाश सुभेदार, अमर बिराजदार, ख्वाजा मुजावर, शिवाजी पवार, देविदास पावशेरे, मोहन शिंदे, दत्ता वाडीकर, गजेंद्र जावळे, फैयाज पठाण, बाळासाहेब बुंदगे, कल्लेश्वर जाधव, शिवाजी सांगवे, बालाजी साळुंके यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————-
कारखान्याची गाळप क्षमता वाढवलेली असून साडेचार हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्यात आली आहे.
यावर्षी सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी याही वर्षी चांगल्या प्रतिचा ऊस गाळपासाठी द्यावा. जेणेकरून या वर्षीप्रमाणे पुढील वर्षीही जास्तीचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप करण्यात येणार असुन सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व सभासदांनी ऊस परिपक्व होण्यासाठी व गाळपासाठी संयम बाळगावा.

\"\"
सुरेश बिराजदार
चेअरमन – भाऊसाहेब बिराजदार कारखाना

Ad 2
Ad 1
Tags: चेअरमन सुरेशदाजी बिराजदारभाऊसाहेब बिराजदार कारखाना
Previous Post

बाबा जाफरी बनले निराधारांचा आधार – दाळिंब येथील आधार वृद्ध भोजन केंद्रामधील निराधारांना संपुर्ण आहेर करून फराळीचं केले वाटप

Next Post

आमचे ग्रहण कधी सुटणार ? – ॲड. शीतल शामराव चव्हाण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आमचे ग्रहण कधी सुटणार ? - ॲड. शीतल शामराव चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!