Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलमध्ये बालदिन साजरा

by admin
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मध्ये सोमवारी (दि.१४) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण समितीचे शंकर जाधव हे होते. यावेळी बाबुराव पोतदार, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्कूलमधील चिमुकल्यांना मार्गदर्शन करताना शंकर जाधव यांनी सांगितले की, नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असत. आणि प्रेमाने मुले त्यांना चाचा नेहरू असे म्हणत. प्रत्येक लहान मुलांनी या वयात आपल्या आई वडीलांनी व शिक्षकांनी दिलेले संस्काराचे आचरण करावे, आपला अभ्यास पूर्ण करून , सातत्य, परिश्रम व जिद्दीने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी देशभक्तीपर बालगीत व बडबडगीत म्हणायला लावून कार्यक्रमात आनंदी वातावरण निर्माण केले.

\"\"

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर सुरवसे, प्रेमदास राठोड, संचिता बाचपल्ले, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, सारिका पवार, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, अस्मिता देवकते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी घंटे यांनी तर व्यंकटेश पोतदार यांनी आभार मानले.

Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलपंडित जवाहरलाल नेहरू जयंतीबालदिन
Previous Post

यशवंत भुसारे यांना विठ्ठल पुरस्कार प्रदान

Next Post

दिव्यांगांनी आदर्श नागरीक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – दिवाणी न्यायाधीश लोहारा श्रीमती एन.एस.सराफ यांचे प्रतिपादन – सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

दिव्यांगांनी आदर्श नागरीक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत - दिवाणी न्यायाधीश लोहारा श्रीमती एन.एस.सराफ यांचे प्रतिपादन - सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेत कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!