वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिनित्त लोहारा शहरात गुरुवारी (दि.१७) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीन बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल व प.स.माजी सभापती विलास भंडारे यांच्या हस्ते मशाल पेटवून अभिवादन करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा शेवटच्या भाषणात माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा असे आवाहन केले होते. त्यांचे हे शब्द आपण शेवटपर्यत पाळु असे प्रतिपादन शेखर पाटिल यांनी यावेळी केले. तसेच यावेळी उपस्थित शिवसैनिक व युवासैनीकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव राहु अशी शपथ घेतली.
यावेळी शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष नाना पाटिल, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, माजी प.स.सभापती विलास भंडारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना नेते पंडित बारगळ, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, कालिदास गोरे, बालाजी माशाळकर, बालाजी जाधव, कुंडलीक सुर्यवंशी, पिंटु गोरे, चेतन गोरे, तुळशिदास शिंदे, विजय फावडे, काका वाघमारे, बसय्या स्वामी, मल्लीनाथ पांचाळ, मैनुद्दिन शेख यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.