Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गावकी, भावकीचा आखाडा ; लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका – उमेदवारांच्या चाचपणीसाठी गावोगावी होत आहेत बैठका

admin by admin
24/11/2022
in आपला जिल्हा, राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या चाचपणीसाठी सध्या गावोगावी बैठका होत असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रापंचायती तसेच नव्याने स्थापीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले होते. या निवडणुकीच्या अनुषंगाने संगणकीय प्रणालीवर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आली असून यासाठी ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार दि.१३ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर निवडणूक आयोगाने हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि गावपुढाऱ्यांची धावपळ सुरू झाली.
लोहारा तालुक्यातील सास्तुर, जेवळी (उ), माकणी, नागुर, वडगाव गांजा, विलासपुर पांढरी, माळेगाव, उंडरगाव, तोरंबा, सालेगाव, हिप्परगा रवा, वडगाववाडी, अचलेर या ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. गावपुढाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु सध्या उमेदवारांच्या चाचपणीसाठी गावोगावी गुप्त बैठका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सरपंच पद ही जनतेतून निवडले जाणार असल्याने सरपंच पदासाठी कोणता उमेदवार द्यायचा यासाठीही बैठका होत असल्याचे दिसून येत आहे.
या १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. ५ डिसेंबर ला प्राप्त नामनिर्देशन पत्राची छानणी होईल. ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येतील. त्यानंतर त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येईल. १८ डिसेंबर ला मतदान होणार असून २० डिसेंबर ला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

राज्यात मागील दोन तीन महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली ताकत दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने आता यापुढील काळात काय काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
———–

🔴 सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे

सर्वसाधारण –
विलासपुर पांढरी, माळेगाव, तोरंबा

सर्वसाधारण स्त्री –
सास्तुर, माकणी, जेवळी (उ), सालेगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री –
वडगाववाडी, अचलेर

अनुसूचित जाती –
उंडरगाव, हिप्परगा (रवा)

अनुसूचित जाती स्त्री –
नागुर, वडगावगांजा
————–

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूकसरपंच
Previous Post

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पोलीस मुख्यालयास भेट – पोलीस कर्मचाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Next Post

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान – ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी – कुठे झाला हा प्रयोग ? वाचा सविस्तर

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान - ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणीचा प्रयोग यशस्वी - कुठे झाला हा प्रयोग ? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506616

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!