वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांचे २ फेब्रुवारी रोजी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे महासत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासत्संग सोहळ्याला उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व शेजारच्या कर्नाटक राज्यातून जवळपास १ लाख साधक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. श्री श्री रवीशंकर २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महासत्संग सोहळ्याला मार्गदर्शन करतील. त्यांचा रात्री तीर्थक्षेत्र तुळजापूरात मुक्कामी राहणार असून ३ फेब्रुवारीला सकाळी तुळजाभवानी मातेचे दर्शन, पुजा करतील. तत्पूर्वी श्री श्री रवीशंकर १ रोजी नांदेड, २ फेब्रुवारी सकाळी जालना येथे ‘महासत्संग’ असणार आहे.





