Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धाराशिवचे ६ स्पर्धक धावले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून

by admin
in आपला जिल्हा, महाराष्ट्र
A A
0

पुणे :
सह्याद्रीच्या कडेकपारीतून, उंच-सखल दऱ्याखोऱ्यांतून चालतानाही जिथे छाती भरून यावी, अशा दुर्गम वाटेवर सलग पाचव्या वर्षी ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन घेण्यात आली. सिंहगड-राजगड-तोरणा या मराठ्यांच्या इतिहासात कोरल्या गेलेल्या गडांच्या मार्गाने ५ देश व भारतातील १५ राज्यांतील किमान ८०० धावपटूंनी 11 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 53 किलोमीटर साठी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्लेमार्गावर ही अनोखी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली होती. तीन किल्ल्यांच्या मार्गावरील या प्रकारची डोंगरी मॅरेथॉन महाराष्ट्रात सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आली. त्यात इंग्लंड, मलेशिया, फिलिपाइन्स, कॅमेरून, फ्रांस, नॉर्वे, इटली या देशांसह भारतातील 15 राज्यांमधून किमान ३५ शहरांतील ८०० स्पर्धक सहभागी झाले. रविवारी सकाळी ६ वाजता सिंहगड पायथ्यालगतच्या गोळेवाडीतून मॅरेथॉन सुरू झाली. सिंहगडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजीवनी माची मार्ग, डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला या मार्गाने वेल्हे आणि पुढे पाबे गावात ही 53 किलोमीटरची स्पर्धा संपली. सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी व पुन्हा पायथ्यापर्यंत अशी ११ किलोमीटरची आणि सिंहगड ते राजगड ही २५ किलोमीटरची शर्यतही झाली.

आंतरराष्ट्रीय मान्यतेची मॅरेथॉन:
\’एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन\’ ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग संघटनेशी संलग्न आहे. २०१९ मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक या मॅरेथॉनसाठी ही पात्र होती. फ्रान्समधील मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माउंटन मॅरेथॉन मानली जाते. त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ३ गुण सिंहगड-राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलेल्या धावपटूंना मिळतील. त्यामुळे पुण्यातली माउंटन मॅरेथॉन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

शिवकालीन मार्गांवरून धावले वीर
सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन ऐतिहासिक किल्ले सह्याद्री डोंगररांगांमध्ये जोडले गेले आहेत. स्पर्धकांना मॅरेथॉनच्या वाटेत टेकड्या, गावे, जंगल, दऱ्याखोरे ओलांडत जावे लागले. कधीकाळी या परिसरात लढाया झालेल्या आहेत. त्यामुळे तलवारीच्या खणखणाटाने आणि घोड्यांच्या टापांनी दणाणून गेलेल्या भागातून धावताना धावपटूंना रोमांचक अनुभव आला. धाराशिव शहरातील श्री. बालाजी साळुंके आणि ऍड. श्री. महादेव यादव यांनी 53 किलोमीटरची सिंहगड-राजगड-तोरणा ही स्पर्धा वेळेच्या किमान एक तास अगोदर पुर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी साळुंके यांना 11 तास 15 मिनिटे 35 सेकंद, तर यादव यांना 11 तास 15 मिनिटे 46 सेकंद लागले. मागील वर्षी यादव यांना ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एक मिनिटाचा विलंब लागला होता, त्यामुळे यावर्षी त्यांनी प्रचंड मेहनत करून जिद्दीने हे अंतर वेळेत पूर्ण केले. तसेच श्री. साळुंके यांनी आत्ता पर्यंत या स्पर्धेत तीन वेळा सहभाग नोंदवला. पहिल्या वर्षी 25 किलोमीटर, आणि नंतर सलग दोन वर्षी 53 किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण केले. तसेच धाराशिव येथील डॉ. श्री. सतीश पवार सर, ऍड. श्री. कुमार लाखे, श्री. बालाजी पवार व लातूर डॉ. श्री. केंद्रे यांनी 25 किलोमीटरची स्पर्धा ही वेळेत पूर्ण केली. त्यामध्ये ते सिंहगडाच्या पायथ्यापासून ते राजगडाच्या पायथ्यापर्यंत कुठेही न थांबता धावले. वरील स्पर्धा सर्वांनी वेळेत पूर्ण केल्यामुळे शहरातील, राज्यातील मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट तसेच धाराशिव स्पोर्ट्स क्लब, उस्मानाबाद आणि उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन ग्रुप यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यंदाच्या वर्षी धाराशिवमध्ये उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन असल्यामुळे बरेचशे स्पर्धक सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्व धाराशिवकरांना 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

Ad 2
Ad 1
Tags: मॅरेथॉन
Previous Post

भेदभाव न करता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे – प्रा.डाॅ. सतीश कदम

Next Post

लोहारा येथील सदाशिव हिरेमठ संस्थान अखंड शिवनाम सप्ताह संपन्न

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा येथील सदाशिव हिरेमठ संस्थान अखंड शिवनाम सप्ताह संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!