Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हाभरात 23 छापे – लोहारा तालुक्यात किती जणांवर झाली कारवाई ? वाचा सविस्तर

admin by admin
16/12/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल गुरुवार दि. 15.12.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 23 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,120 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट नष्ट करण्यात आला तर सुमारे 728 लि. गावठी दारु, सुमारे 180 लि. शिंदी हे अंमली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 241 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,99,906 ₹ आहे. यावरुन 24 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 23 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात डिग्गी, ता. उमरगा येथील- संजय पवार व खलील जमादार हे दोघे 12.50 वा. सु. संजय पवार यांच्या डिग्गी येथील शेताजवळ 10 लोखंडी- प्लास्टीक पिंपांत गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 2,520 लि. द्रव पदार्थ, 10 कि.ग्रॅ. वजनाच्या 180 गुळाच्या ढेपी व 90 लि. गावठी दारु असा माल बाळगलेले, तर माडज येथील- काशीनाथ सुगावे हे 19.30 वा. सु. गावातील आपल्या हॉटेलबाजूस 18 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
2) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात वाशी पो.ठा. हद्दीत गोजवाडा, ता. वाशी येथील- मनिषा शिंदे या 13.30 वा. सु. आपल्या घरासमोर देशी- विदेशी दारुच्या 116 सिलबंद बाटल्या बाळगलेल्या आढळल्या. तर भुम पो.ठा. हद्दीत पारधी पिढी, भुम येथील- ताराबाई काळे या 17.00 वा. सु. पिढीवरील आपल्या घरासमोर 220 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. तसेच तुळजापूर पो.ठा. हद्दीत जवाहर चौक, तुळजापूर येथील- भारतसिंग राजपूत हे 20.30 वा. सु. नवीन बस स्थानकाजवळील शेडसमोर 180 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.
3) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यात हंगरगा फाटा येथील- परमेश्वर गायकवाड हे 18.20 वा. सु. हंगरगा फाटा येथे 30 लि. गावठी दारु बाळगलेले, तर तुळजापूर येथील- रामा क्षिरसागर हे 18.50 वा. सु. तुळजापूर येथील मार्केट परिसरात देशी- विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर कुंभारी, ता. तुळजापूर येथील- शशिकांत तांबे हे 19.00 वा. सु. कुंभारी ते कोरेवाडी रस्त्यालगतच्या रानवारा ढाब्यावर देशी दारुच्या 22 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर अपसिंगा येथील- कर्ण डोलारे हे 19.30 वा. सु गावातील आपल्या घरासमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
4) मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात मुरुम येथील- सिध्देश्वर तांबोरे हे 10.30 वा. सु. गावातील मारुती मंदीराजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले, तर आलुर येथील- छगण लोहार हे 19.00 वा. सु. गावातील अचलेर रस्त्याकडेला देशी दारुच्या 6 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
5) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात जेवळी येथील- दाउद पठाण हे 13.10 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर देशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर उदतपूर, ता. लोहारा येथील- बिभीषन दलाल हे 19.00 वा. सु. गावातील आपल्या हॉटेलसमोर देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
6) ढोकी पो.ठा. च्या पथकाने कोंड गावात 2 छापे टाकले. यात कोंड ग्रामस्थ- नवनाथ भोसले हे 19.45 वा. सु. नितळी रस्त्यालगत 65 लि. गावठी दारु बाळगलेले, तर श्रावण जाधव हे 20.30 वा. सु. गावातील बाजार तलावजवळील शेडसमोर 70 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
7) भुम पो.ठा. च्या पथकाने पारधीपिढी, भुम येथे 2 छापे टाकले. यात पारधिपीडी येथील- मंगलबाई काळे या 14.20 वा. सु. पिढीवरील आपल्या घरासमोर 180 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर आरसोली, ता. भुम येथील- आप्पा काळे हे 17.30 वा. सु. पारधीपिढी परिसरात 15 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
8) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात समुद्रवाणी येथील- प्रभु राठोड हे 18.20 वा. सु. उस्मानाबाद ते औसा रस्त्यालगतच्या एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर रुईभर येथील- प्रविण शेरखाने हे 18.50 वा. सु. गावातील चिकन दुकानाजवळ देशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
9) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने केशेगाव गावात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- मुबीन फकिर हे 20.00 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
10) अंबी पो.ठा. च्या पथकाने डोंजा शिवारात छापा टाकला. यावेळी करमाळा, जि. सोलापूर येथील- सोमनाथ काळे हे 14.50 वा. सु. डोंजा ते बंगाळवाडी रस्त्यावर 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
11) शिराढोन पो.ठा. च्या पथकाने लोहटा गावात छापा टाकला. यावेळी करंजकल्ला ग्रामस्थ- अमरसिंह पवार हे 15.30 वा. सु. लोहटा येथील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
12) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने वाघोली, ता. कळंब येथे छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- कलावती पवार या 20.30 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 600 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असताना आढळल्या.

Tags: उस्मानाबाद पोलीस
Previous Post

लोहारा तालुका जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. प्रशांत काळे तर सचिवपदी प्रा. शंकर शिंदे यांची निवड

Next Post

ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार – राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार - राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's