वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील पार्वती मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शनिवारी (दि. २४) करण्यात आले. पार्वती मल्टिस्टेटच्या लोहारा शाखेचे सल्लागार शिवाजी अप्पा कदम यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मधुकर पवार, प्रीतम होळकुंदे, अमित देशमुख, प्रविण जगताप, गिरीश भगत, रतन धर्माधिकारी, गोपाळ माने, संकेत बनसोडे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक मनोज देशपांडे, मंगेश राजपूत, दिपक दुधभाते अभिजित रोडगे, लक्ष्मी आदटराव, स्वाती हिरके आदी उपस्थित होते.