Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्कसक्ती – उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी जनतेला काय केले आवाहन – वाचा सविस्तर

admin by admin
24/12/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF7 संक्रमित झाल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक, महंत, पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात मास्क सक्ती करण्यात आली आहे.
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव ३० डिसेंबर पासून घटस्थापनेने सुरुवात होत असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जनतेला केलेले आवाहन

उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, मा. सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार यांचे दि. 20 व 23 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये जपान, अमेरिका, कोरिया प्रजासत्ताक, ब्राझील व चीन या देशांमध्ये कोविड-19 विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच देशातील आगामी सणउत्सवांच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता तात्काळ आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, नवी दिल्ली यांनी त्यांचे प्रसिद्धीपत्रक दि. 22 डिसेंबर 2022 अन्वये चीन या देशात आढळून आलेल्या कोविड-19 विषाणूच्या BF-7 या प्रकाराने बाधित झालेले चार रुग्ण देशात आढळून आले असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
या पार्श्वभूमीवर “प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक चांगला” या तत्त्वानुसार उस्मानाबाद जिल्हयातील जनतेने घाबरून न जाता कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खालील नमूद बाबींचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी केले आहे.

1. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नाक व तोंडावर मास्क लावावा.
2. गर्दीच्या ठिकाणी (जसे लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम इ.) जाणे टाळावे.
3. सामाजिक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर (2 गज की दूरी) ठेवावे.
4. आपले हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा.
5. आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.
6. ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, जुलाब इ. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या दवाखान्यास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
7. कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करुन घ्यावे.
8. सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.
9. नेहमी खोकताना, शिंकताना नाक व तोंड स्वच्छ रुमालाने /हात कोपरात दुमडून हाताने झाकून कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे.
10. शासनाकडून व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड - 19जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद
Previous Post

लोहारा येथे पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post

डॉ. बाळासाहेब मैंद यांची एनएसएसच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी निवड

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

डॉ. बाळासाहेब मैंद यांची एनएसएसच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's