Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

नूतन वर्षाचे स्वागत व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
नूतन वर्षाचे स्वागत व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी (दि.२) विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा आणि माता पालकांची रांगोळी व डिश डेकोरेशन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका मयुरी बिराजदार, आरती कोरे, माजी जि.प.सदस्या मीराताई फुलसुंदर, सरिता बहनजी, रंजना हासुरे, परिक्षक विद्या मक्तेदार, सचिन शिंदे, प्राचार्य शहाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांना पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहाजी जाधव म्हणाले की, दि. २६ डिसेंबर ते १ जानेवारी या सात दिवसात स्कूलमध्ये रेंबो वीक सेलिब्रेशन निमित्त हस्ताक्षर, चित्रकला, गीत गायन, पाठांतर, क्रिडा स्पर्धा असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

\"स्पर्धा\"

यानंतर सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना काय करावे व काय करू नये याबाबत आपण सांगून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण देणे हि काळाची गरज बनली आहे. यावेळी उपस्थित माता पालकांना मार्गदर्शन करताना सरिता बहनजी यांनी सांगितले की, आपल्या पाल्यास पालकांनी मोबाईलपासून दूर ठेवून त्यांना वेळ देवून प्रेम, जिव्हाळा वाढविणे गरजेचे आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शेतकरी, सैनिक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, झाशीची राणी, सावित्रीबाईं फुले, जिजाऊ, आदिवासी अशा विविध वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. मास्क वापरा, सॅनिटायजरचा उपयोग करा असे सांगून कोरोना विषयी जनजागृती केली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते एका विद्यार्थ्याने नवरदेवाच्या वेशभूषेत येवून मला बायको मिळेल का हो? असे आताच्या तरुणाची व्यथा मांडताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. तसेच माता पालकांनी डिश डेकोरेशन स्पर्धेमध्ये गाजर व भोपळ्याचा हलवा, गुलाबजामून , खीर, नारळ्याच्या वड्या, फ्रूट सॅलड, ढोकळा, समोसे, दही धपाटे, बाजरीची भाकरी, व्हेज बिर्याणी, पुलाव, पावभाजी, भेळ, कोफ्ते, मंचुरियन, इडली, मेंदू वडा इत्यादी चविष्ट, सुंदर खाद्यपदार्थ बनविण्यात आले होते. तसेच सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढून मुलगी शिकवा, पाणी वाचवा, झाडे लावा, असे सामाजिक संदेश आपल्या रांगोळीतून देण्यात आला.

\"महिला\"
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी होगाडे, सरिता पवार यांनी तर सविता जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर सुरवसे, सोमनाथ कुसळकर, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, मयुरी नारायणकर, मीरा माने, संतोषी घंटे, चांदबी चाऊस, निलोफर बागवान, स्वामींनी होंडराव, शिवानी बिडवे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलसावित्रीबाई फुले जयंती
Previous Post

पत्रकार निळकंठ कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार वितरण

Next Post

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद पाटील यांची निवड

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद पाटील यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!