Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास नॅककडून मानांकन मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. पाटील यांचा सत्कार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास नॅककडून \’बी प्लस\’ मानांकन मिळाल्याबद्दल फिनिक्स कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने संचालक मारूती लोहार यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मागील आठवड्यात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) समितीचे अध्यक्ष ओरिसा येथील फकीर मोहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भगवान दास, समन्वयक म्हणून गुहाटी येथील प्रा. ग.जोतिष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कुमार महंता यांनी शहरातील शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास दोन दिवसीय भेट दिली होती. महाविद्यालयातील भौतिक व शैक्षणिक सोयी सुविधांची पाहणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांच्याकडून महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे जाणून घेतली. महाविद्यालयाच्या सोयीसुविधाबाबात समाधान व्यक्त करून नॅक समितीने नॅक समितीने शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास \’बी प्लस\’ मानांकन दिले.

\"नॅक\"
शंकरराव जावळे-पाटील महाविद्यालयास बी प्लस\’ मानांकन मिळाल्याबद्दल शहरातील फिनिक्स कॉम्प्युटर सेंटरचे संचालक मारूती लोहार यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी एमकेसीएलचे उस्मानाबाद जाहिरातप्रमुख अविनाश पांचाळ, डॉ. प्रा. आर. एम. सूर्यवंशी, शिरीष देशमुख, नंदकिशोर माने आदी उपस्थित होते.

Previous Post

अनावश्यक खर्च टाळून निवासी दिव्यांग शाळेत वाढदिवस साजरा – फावडे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

Next Post

सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य व महारक्तदान शिबीर

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात उद्या महाआरोग्य व महारक्तदान शिबीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!