Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथील जि. प. शाळेत आनंद मेळावा – १२० स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली विविध पदार्थांची विक्री

by admin
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.१०) आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या आनंद मेळाव्यात १२० स्टॉल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांची विक्री केली.
विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यामध्ये पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये एकूण १२० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह उपनगराध्यक्ष आयुब शेख, अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील, दिपक रोडगे, श्रीकांत भरारे, गोपाळ संदिकर उपस्थित होते. यावेळी पालक व नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

\"आनंद \"\"

तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या पदार्थांची खरेदी केली. शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, शिक्षक सुरेश अंबुरे, मच्छिंद्र भुजबळ, दत्तात्रय फावडे, राजकुमार दीक्षित, बालाजी यादव, गुरुनाथ पांचाळ, प्रवीण शिंदे, सुरेश साळुंखे, जहरुद्दीन शेख, अमोल जट्टे, संतोष माळवदकर, महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी, सचिन शिंदे, मनीषा भोजने, ज्योती पाटील, प्रमोद सरवदे, नेहा भंडारे, सोनम कांबळे, दयानंद शिरसागर व अतुल भड उपस्थित होते. या मेळाव्याचा शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.

Tags: आनंद मेळावा
Previous Post

भातागळी सोसायटीच्या चेअरमनपदी जगताप तर व्हाईस चेअरमन पदी पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

लोहारा तालुक्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण आंदोलन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!