वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नाफेड अंतर्गत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई सब एजंट संस्था जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था लोहारा यांच्या साहाय्याने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ लोहारा तालुक्यातील मार्डी येथे बुधवारी ( दि. १५) सकाळी जिल्हा मार्केटिंग पणन अधिकारी हरीदास भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सरकारचा हमीभाव ५३३५ रु. प्रति क्विंटल या भावाने चना (हरभरा) खरेदी होणार आहे.
यावेळी नायब तहसीलदार माधव जाधव, मोहन सुरवसे, शेखर शेंडिकर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा नगरसेवक अविनाश माळी, संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील, संत मारुती महाराज ऍग्रो प्रोडयुसर कंपनी चेअरमन योगेश देवकर, संस्थेचे संचालक संतराम पाटील, जिल्हा सहकार बोर्ड संचालक जगन्नाथ मसलकर, पंडित बारगळ, माजी सरपंच प्रकाश गर्जे, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, उमराव देवकर, बळी वडजे, उमाकांत घाडवे, महेश तोडकरी, शंकर क्षिरसागर, आकाश घाटे, दाजी दुधंबे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरभरा खरेदी सहजरित्या होईल फक्त शेतकरी बांधवांनी 7/12 उतारा, आधारकार्ड, बॅंक पासबुक देऊन ऑनलाइन करून घ्यावे व हरभरा मोजणीसाठी तात्काळ आणावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केले आहे.





