वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळीचे माजी सरपंच प्रविण पाटील यांचे वडील सुभाष बाबा पाटील यांचा अमृतमहोत्सवी (७५ वा) वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धान्य, वह्या, पुस्तके, पेना व साड्यांची तुला करण्यात आली. त्यानंतर तुला केलेले हे साहीत्य शाळा व गावातील गरिब महिलांना वाटप करण्यात आले. यावेळी उन्नती शिक्षण प्रसारक मंडळ दहिटने ता. अक्कलकोटचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गौडगाव ता. बार्शी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. गरड, जेवळी येथील ह.भ.प. कोळे गुरजी, माळेगावचे श्री. गर्जे, तोरंब्याचे सुग्रीव गुरजी यांच्या सह तालुक्यातील व भातागळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.