वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सावरकर गौरव यात्रा रविवारी (दि.९) लोहारा शहरात आली होती. या यात्रेचे भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरुवात शहरातील जगदंबा मंदिरापासून करण्यात आली. पुढे ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आली.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, विक्रांत संगशेट्टी आदींनी सावरकर गौरव यात्रेविषयी विचार व्यक्त केले. यावेळी या गौरव यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी यांच्यासह इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, नेताजी शिंदे, बालाजी चव्हाण, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, शिवसेना माजी गटनेते अभिमान खराडे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक श्रीनीवास माळी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, प्रशांत माळवदकर, संजय कदम, प्रताप लोभे, ओम कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सलीम मुजावर, गोविंद यादव, सरपंच वैभव पवार, संपत देवकर, दत्ता देवकर, आप्पाराव पाटील, चंदु मनाळे, व्यंकट कागे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, अमिर मुजावर, श्रीहरी साळुंके, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, सिध्दु गोफणे, दिलीप पुजारी, मल्लिनाथ फावडे, मनोज तिगाडे, अंबादास कलकुटगे, कल्याण ढगे, दत्ता कडबाने, युवराज जाधव, अशोक तिगाडे आदी भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.