उमरगा तालुक्यातील मुरूम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बापूराव पाटील तर उपसभापती पदी बसवराज कारभारी यांची गुरुवारी (दि.२५) बिनविरोध निवड झाली आहे.
मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया तर २९ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली होती. महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल प्रमुख बापूराव पाटील यांनी बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखत १५ संचालक निवडून आणले होते. २५ मे रोजी सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी बापूराव पाटील यांची सभापतीपदी तर बसवराज कारभारी यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. स्थापनेपासूनच मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बापूराव पाटील यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. मुरूम शहर व परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट नेते बसवराज वरनाळे सह कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक मंडळ, महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.