शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. सामना या मुखपत्रातून या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड झाल्याचे कळताच लोहारा शहरातील पदाधिकाऱ्यांनी अमोल बिराजदार यांचा सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, रघुवीर घोडके, प्रेम लांडगे, पिंटू गोरे, नरदेव कदम, समद बागवान, हेमंत माळवदकर, बब्रुवान माटे, अप्पू स्वामी उपस्थित होते.